डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी ११ हजार सैनिक तैनात

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी निमलष्करी दलाच्या ११९ कंपन्या म्हणजे एकूण ११ हजार सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. एका जिल्ह्यात तीन ते पाच कंपन्या तैनात करण्यात येणार आहेत. झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार असून पहिला टप्पा १३ नोव्हेंबरला तर दुसरा टप्पा २० नोव्हेंबरला होणार आहे. निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे.