डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

झारखंडमधे रस्ते अपघातात सहा कावडयात्रींचा मृत्यू, २४ जण जखमी

झारखंडमधल्या मोहनपूर गटातल्या देवघर-हंसदिहा रस्त्यावर आज सकाळी बस आणि ट्रकच्या अपघातात सहा कावडयात्रींचा मृत्यू झाला, तर २४ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात  दाखल करण्यात  आलं आहे. मात्र जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. हे कावडयात्री बसमधून देवघरला जात होते. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत हा अपघात दुःखद असल्याचं म्हटलं आहे. तसंच जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.