डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 15, 2025 2:43 PM

printer

झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात सुरक्षादलांच्या संयुक्त कारवाईत ३ नक्षली ठार

झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात सुरक्षादलांच्या संयुक्त कारवाईत ३ नक्षली ठार झाले. करांडी गावात हे नक्षली लपून बसल्याची खबर मिळाल्यवरुन झारखंड पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा बटालियनने ही कारवाई केली.

 

ठार झालेल्यात सेंट्रल कमिटीचा सदस्य सहदेव सोरेन उर्फ परवेश याच्यावर १ कोटी रुपयांचं बक्षीस होतं.  बिहार झारखंड स्पेशल एरिया कमिटीचा सदस्य रघुनाथ हेंब्रोम उर्फ चंचल याच्यावर २५ लाख रुपयांचं तर  झोनल कमिटी मेंबर बिरसेन गंजू उर्फ रामखेलवान याच्यावर १० लाख रुपयांचं बक्षीस होतं. चकमकीच्या ठिकाणाहून एके 47 रायफल सह शस्त्र आणि स्फोटकं पोलिसांनी जप्त केली आहेत. 

 

दरम्यान पलामू जिल्ह्यातल्या मनातू जंगल परिसरात काल झालेल्या चकमकीत TSPC एरिया कमांडर मुखदेव यादव मारला गेला. बोकारोतला झुमरा आणि लुगु पहार परिसर तसंच गिरिदीहचा पारसनाथ परिसर आता पूर्णपणे नक्षलमुक्त झाला असल्याचा दावा झारखंडचे पोलीस महानिरीक्षक मायकेलराज एस यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना केला.