November 24, 2024 1:41 PM | Jharkhand

printer

झारखंडमध्ये विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी इंडिया आघाडीची रांचीमध्ये बैठक

झारखंडमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्याच्या निवडीसाठी घटकपक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज रांची इथं होणार आहे. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार या बैठकीला हजर राहतील. इंडिया आघाडीच्या विधानसभा पक्षनेतेपदी हेमंत सोरेन यांची निवड होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यानंतर हेमंत सोरेन झारखंडमध्ये सरकारस्थापनेचा दावा करतील. झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. ८१ पैकी ३४ जागांवर झारखंड मुक्ती मोर्चाला विजय मिळाला आहे. भाजपाला २१, काँग्रेसला १६, तर राष्ट्रीय जनता दलाला ४ जागांवर विजय मिळाला आहे. मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाला दोन जागांवर जनतेनं कौल दिला आहे.