डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सौदी अरेबिया आभूषण प्रदर्शन 2025 चा आज जेद्दाहमध्ये प्रारंभ

रत्न आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेनं आयोजित केलेल्या सौदी अरेबिया आभूषण प्रदर्शन 2025 चा आज जेद्दाहमध्ये प्रारंभ झाला. जेद्दाह इथला भारतीय वाणिज्य दूतावास, रियाधमधला भारतीय दूतावास तसंच भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या सहकार्यातून या दोन दिवसीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

 

या प्रदर्शनात २५० स्टॉलमधून २०० हून अधिक प्रदर्शक सहभागी होतील तर २ हजारांहून अधिक व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी होतील असा अंदाज आहे. या प्रदर्शनात सोनं आणि विविध रत्नाची आभूषणं, तसंच दागिने तयार करण्यासाठी वापरलं जाणारं अत्याधुनिक तंत्रज्ञान मांडण्यात आलं आहे. भारत आणि सौदी दरम्यानचे व्यापारी संबंध दृढ करणे, हा या प्रदर्शनाचा  उद्देश आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.