जेरुसलेममधील एका वर्दळीच्या एका प्रमुख चौकात काही बंदूकधारी लोकांनी बसवर गोळीबार केल्यामुळे काल किमान सहा जण ठार तर 12 जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर दोन दहशतवाद्यांना लगेचच पकडण्यात आल्याची माहिती इस्रायल पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान जेरुसलेममध्ये निष्पाप नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला आहे. भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा कायमच निषेध करतो. दहशतवादा विरोधात शून्य सहनशीलतेच्या आपल्या धोरणावर भारत ठाम असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.