डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विंबल्डनच्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत जेनिक सिनर याने इटलीच्या लुका नार्डीचा केला पराभव

टेनिस जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरच्या जेनिक सिनर याने विंबल्डनच्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या पहिल्या फेरीत इटलीच्या लुका नार्डी याचा सरळ सेटमध्ये पराभव केला. आतापर्यंत २४ वेळा ग्रँड स्लॅम विजेता ठरलेल्या नोवाक जोकोविचने फ्रेंच खेळाडू अलेक्झांड्रे मुलर विरुद्धच्या पहिल्या फेरीतील सामन्यात ४ सेटमध्ये विजय मिळवून आठव्या विम्बल्डन विजेतेपदासाठी पाऊल पुढं टाकलं आहे. काही दिवसांपूर्वी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची विजेती ठरलेली कोको गॉफ हिला विम्बल्डनच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. यूक्रेनच्या डायाना यास्त्रेमस्का हिने गॉफला ७-६, ६-१ असं पराभूत केलं. दरम्यान भारतीय खेळाडूंचे सामने आजपासून सुरु होत आहेत. पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत रोहन बोपण्णा, युकी भांब्री, श्रीराम बालाजी आणि ऋत्विक चौधरी बोलीपल्ली यांचा आपापल्या साथीदाराबरोबर खेळतील

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.