पुण्याजवळ जेजुरी-मोरगाव रस्त्यावर काल संध्याकाळी भरधाव टेम्पो आणि चारचाकी गाडीच्या अपघातात ८ जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले. जखमींना जेजुरीच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
या अपघाताबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींना ५० हजार रुपये दिले जातील, अशी घोषणा केली आहे.