ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केलेल्या महिलेला सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं खंडणीच्या आरोपावरुन अटक केली आहे. ३ कोटी रुपये दिले नाहीत तर जयकुमार गोरे यांच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्याची धमकी तिने दिली होती.
सदर महिला तिच्या वकीलामार्फत 2 टप्प्यात पैसे मागत असल्याचं फोन संभाषण रेकॉर्ड करण्यात आलं. यानुसार सापळा रचत त्या महिलेला आज 1 कोटी रुपये वकिलांच्या कार्यालयात स्वीकारताना पोलिसांनी अटक केली.