January 17, 2026 3:19 PM | Jayashree Patankar

printer

आकाशवाणीच्या वृत्तविभागाच्या माजी वृत्तनिवेदिका जयश्री पाटणकर यांचं निधन

आकाशवाणीच्या वृत्त विभागातल्या माजी वृत्त निवेदिका जयश्री पाटणकर यांचं काल मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्या ७० वर्षांच्या होत्या. सुरुवातीला राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयात काम केल्यानंतर  दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या वृत्तविभागात त्यांनी जवळपास तीन  दशकांहून‍ अधिक काम केलं होतं.