डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा राज्यपातळीवर घेण्याची जयंत पाटील यांची मागणी

विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा राज्यपातळीवर घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट-पीजी पुढे ढकलल्याबद्दल त्यांनी  केंद्र सरकारवर टीका केली आहे.

 

विविध प्रवेशपरीक्षांवरच्या आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर आजची नीट-पीजी  रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.  विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे आणि परीक्षेचं सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे.