जव्हार इथल्या प्रकल्प कार्यक्षेत्रातल्या सरपंच आणि महिला बचत गटांना प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाबद्दल माहिती व्हावी यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत जव्हार प्रकल्प कार्यक्षेत्रातल्या जव्हार, मोखाडा, वाडा आणि विक्रमगड तालुक्यातल्या सरपंचांनी आणि महिला बचत गटांनी आपला सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थितांनी धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान नेमकं काय आहे याची माहिती जाणून घेतली.
Site Admin | July 20, 2025 6:49 PM | Jawhar Project | Palghar
जव्हार प्रकल्प कार्यक्षेत्रातल्या सरपंच आणि महिला बचत गटांसाठी कार्यशाळेचं आयोजन
