डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जसप्रीत बुमराह आणि स्मृती मन्धाना आयसीसीचे जून महिन्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान जून २०२४ करता जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना या भारतीय क्रिकेटपटूंनी मिळवला आहे.  नुकत्याच झालेल्या टी२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुमराहच्या गोलंदाजीमुळे भारतीय संघाला विश्वचषकाला गवसणी घालता आली. या स्पर्धेतल्या ८ सामन्यात मिळून बुमराहनं १५ गडी बाद केले. महिला क्रिकेटपटू स्मृती मान्धना हिनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात केलेल्या नेत्रदीपक कामगिरीबद्दल तिला हा बहुमान मिळाला आहे. तिनं इंग्लंडच्या माईया बौशेअर आणि श्रीलंकेच्या विशमी गुणरत्ने यांना मागे टाकत हा सन्मान मिळवला.