सार्वत्रिक निवडणुका लवकर घेण्यासाठी जपानच्या प्रधानमंत्री सने ताकाईची संसदेचं कनिष्ठ सभागृह बरखास्त केलं आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी ही घोषणा केली. कनिष्ठ सभागृहात त्यांच्याकडे निसटतं बहुमत आहे आणि वरिष्ठ सभागृहात त्यांच्याकडे बहुमत नाही. त्यामुळं अनेक निर्णय घेताना त्यांना अडचणी येत होत्या. मतदारांकडून पुन्हा जनमत घेण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगत त्यांनी प्रधानमंत्री पदावर कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये जपानच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. ८ फेब्रुवारीला जपानमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे.
Site Admin | January 19, 2026 6:35 PM | #JapanElection #SanaeTakaichi
जपानच्या प्रधानमंत्री सने ताकाईची संसदेचं कनिष्ठ सभागृह बरखास्त