जपानच्या नवनियुक्त प्रधानमंत्री सनाई ताकाइची यांनी स्वतःसह मंत्रिमंडळ सदस्यांचं वेतन कमी करण्यासाठी सरकारी कर्मचारी वेतन कायद्यात सुधारणा करण्याची योजना आखली आहे. जपान मधल्या प्रशासकीय आणि वित्तीय सुधारणांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणाचा हा एक भाग आहे.
या प्रस्तावावर संसदेमध्ये संबंधित मंत्र्यांच्या बैठकीत येत्या मंगळवार पर्यंत चर्चा होण्याची अपेक्षा आहे. या प्रस्तावानुसार प्रधानमंत्री आणि इतर मंत्र्यांना त्यांच्या खासदार म्हणून मिळणाऱ्या वेतनाव्यतिरिक्त सध्या दिले जाणारे अतिरिक्त भत्ते देखील तात्पुरते थांबवले जातील.