जपानमध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या ‘एलडीपी’, अर्थात, ‘लिबरल डेमोक्रेटिक पार्टी’मध्ये पडणारी संभाव्य फूट टाळण्याकरता जपानचे प्रधानमंत्री शिगेरु इशिबा यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यात इशिबा यांच्या एलडीपी प्रणित आघाडी सरकारनं तिथल्या वरिष्ठ सभागृहात बहुमत गमावल्यानंतर आता जपानचं सरकारी प्रसारमाध्यम असलेल्या ‘एनएचके’नं आज याबाबतचं वृत्त प्रसारित केलं. निवडणुकांमध्ये त्यांच्या आघाडी सरकारला पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर काही आठवड्यांपूर्वी पसरलेल्या त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताचं प्रधानमंत्र्यांनी खंडन केलं होतं. अमेरिकेबरोबर सुरु असलेल्या करप्रस्तावाबाबतच्या अडकून पडलेल्या वाटाघाटी मार्गी लावायच्या असल्यानं आपण राजीनामा देणार नसल्याचं इशिबा यांनी गेल्या मंगळवारी सांगितलं होतं.
Site Admin | September 7, 2025 3:39 PM | Japan
जपानचे प्रधानमंत्री शिगेरु इशिबा यांचा राजीनामा द्यायचा निर्णय
