येत्या तीन आठवड्यात अमेरिकेकडून शुल्क आकारण्याच्या भीतीमुळे जपानने सुरक्षा, अन्न आणि ऊर्जा यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये अमेरिकेवरील अवलंबित्व संपवावे असे जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या शुल्क धोरणाचे अनुसरण करण्याऐवजी जपानने सुरक्षा, ऊर्जा आणि अन्न क्षेत्रात अधिक स्वावलंबी होण्याची आवश्यकता आहे. असं एका मुलाखतीत बोलताना प्रधानमंत्री इशिबा म्हणाले. अमेरिका १ ऑगस्टपासून जपानी आयातीवर २५ टक्के शुल्क लावणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी प्रधानमंत्री इशिबा यांना कळवलं आहे.