डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जपानने राज्यात उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून अनेक जपानी कंपन्या राज्यात चांगलं काम करत आहेत. जपानने भविष्यात देखील राज्यात उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

 

जपानचे नवनियुक्त कॉन्सुलेट जनरल यागी कोजी यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. भारत आणि जपान हे आशिया खंडातले महत्वाचे देश असून दोन्ही देशांचे संबंध खूप जुने असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. जपानी कंपन्यांनी मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासात सहकार्य केलं असल्याचंही ते यावेळी म्हणाले. तर भारत आणि जपान यांच्यातले संबंध अधिक दृढ व्हावेत, अशी इच्छा यागी कोजी  यांनी व्यक्त केली.