जपानचे प्रधानमंत्री शिगेरु इशिबा यांनी आज राजीनामा दिला. इशिबा यांच्या नेतृत्वातल्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या आघाडी सरकारला निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागल्यानं तिथल्या संसदीय सभागृहात त्यांनी बहुमत गमावलं होतं. गेल्या १५ वर्षांमध्ये ‘एलडीपी’ या पक्षाला पहिल्यांदाच पराभवाला सामोरं जावं लागलं. नव्या प्रधानमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत ते प्रधानमंत्री पदाची जबाबदारी सांभाळतील, असं ते म्हणाले. वाढती महागाई, राहणीमानाच्या खर्चासंदर्भात ओढवलेली संकट, अमेरिकेसोबत ताणलेले संबंध, मंत्रिमंडळातल्या नियुक्त्या आणि पक्षाकरता स्विकारलेल्या भेटी अशा अनेक मुद्यांवरून त्यांची कारकीर्द गाजली.
Site Admin | September 7, 2025 8:10 PM | JAPAN PM RESIGN
जपानचे प्रधानमंत्री शिगेरु इशिबा यांचा राजीनामा
