डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

October 28, 2024 2:37 PM | Japan Elections

printer

जपानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीत सत्तापालट

जपानमध्ये काल झालेल्या सार्वत्रीक निवडणुकीच्या मतमोजणीत जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमॉक्रॅटीक युतीला बहुमत गमवावं लागलं. मतमोजणी नुसार विरोधी पक्षांनी कनिष्ठ सभागृहात अर्ध्यापेक्षा जास्त जागा जिंकल्या. डेमॉक्रॅटीक पार्टी आघाडीला  जागा मिळाल्या, तर विरोधी पक्षाला २३५ जागा मिळाल्या. त्यात मुख्य विरोधी पक्ष काँस्टीट्युशनल डेमॉक्रॅटीक पार्टीला १४३जागा मिळाल्या. अजून २२ जागांचे निकाल येणं बाकी आहे. सत्तेत येण्यासाठी २३३ जागा जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळे विरोधी पक्ष सत्तेत येणं जवळपास निश्चित झालं आहे. दरम्यान, जपानच्या स्थैर्यासाठी आणि लोकांच्या जीवाचं रक्षण करण्यासाठी डेमॉक्रॅटीक पक्षाचं सरकार पुन्हा स्थापन करायला अन्य पक्षांनी पाठींबा देण्याचं आवाहन प्रधानमंत्री शिगेरू ईशुबा यांनी केलं आहे.