जपानमध्ये, आओमोरी प्रांताच्या पूर्व किनाऱ्यावर आज सकाळी ६ पूर्णांक ७ दशांश रिक्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू केप एरिमो प्रांताच्या नैऋत्येला सुमारे १२० किलोमीटर अंतरावर भूगर्भात २० किलोमीटर खोलीवर होता.
जपानच्या हवामान संस्थेनं भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा दिला असून, समुद्रात मासेमारीसाठी किंवा नौकानयनासाठी गेलेल्यांनी ताबडतोब किनाऱ्यावर परतावं असे निर्देश दिले आहेत.