जनता दरबारात आपले प्रश्न सोडवले जातील अशा विश्वासाने नागरिक मोठ्या प्रमाणात याउपक्रमात सहभागी होतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
नागपूरमधे हैदराबाद हाऊस इथं आयोजित जनता दरबाराच्या वेळी ते बोलत होते. या दरबारात सादर होणाऱ्या जनसामान्यांच्या अडी अडचणी संबंधित विभागांकडे पाठवल्या जातात आणि त्या बाबत पाठपुरावाही केला जातो असं मुख्यमंत्री म्हणाले.