डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन

आदिवासी संस्कृती जपण्यासाठी सरकारनं अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे आणि अनेक नव्या योजना आखल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात  दिली. स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीचं औचित्य साधून आयोजित राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्धाटन समारंभात ते  बोलत होते.

 

महाराष्ट्रात एक कोटी २५ लाख आदिवासी असून १६ जिल्ह्यात त्यांच्या ४५ जमाती आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. आदिवासींना जल, जमीन आणि जंगलापासून न तोडता त्यांना संरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले. आदिवासी नायकांना शोधून त्यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठीही सरकारनं प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय रस्ते, परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते. त्यांनी सरकार आदिवासींच्या प्रगतीसाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. 

 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘श्रीमती अनसूयाबाई काळे स्मृती सदना’चं आणि पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या ‘नोकरी करणाऱ्या महिला आणि मुलींच्या वसतीगृहा’चं उदघाटन केलं.