डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बारामती इथं जन सन्मान’ रॅलीचं आयोजन

जनतेचा विकास आणि गरिबांना सहाय्य हाच विचार आम्ही विधानसभा निवडणुकीत राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन सर्व जनतेला सांगणार आहोत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. बारामती इथं आयोजित जन सन्मान’ रॅलीत ते आज बोलत होते. महाराष्ट्रात आबालवृद्ध किंवा माता भगिनींवर अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. चांद्यापासून बांद्यापर्यत राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये जमा होणार आहेत, तीन सिलेंडर मोफत दिले जाणार असून राज्यातल्या महिलांना  सक्षम आणि आत्मनिर्भर करण्याकरता महायुतीनं ही योजना आणली आहे, असं अजित पवार म्हणाले. राज्य सरकारनं  शेतकऱ्यांना मोफत वीज, एक रुपयात पीक विमा, कापूस आणि सोयाबीनला एकरी पाच हजार रुपये तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव पाच रुपये अनुदान दिलं आहे, असं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यावेळी उपस्थित होते.