जम्मू काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यातल्या शुकरू केल्लर वन विभागात संरक्षण दल आणि दहशतवादी यांच्यात आज सकाळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. हे दहशतवादी लष्कर ए तैयबा किंवा द रेझिस्टन्स फ्रंट चे सदस्य असल्याची शक्यता काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक व्ही के बिर्दी यांनी वर्तवली आहे.
या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाने शोध मोहीम सुरू केली होती. संरक्षण दलाचे जवान संशयित ठिकाणी पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर चकमक सुरू झाली.