डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

Pahalgam Attack : जम्मू काश्मीरमध्ये २ संशयित ताब्यात

सुरक्षा यंत्रणांनी अतिरेक्यांची शोध मोहीम वेगाने हाती घेतली आहे. आज जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात दोन संशयितांना ताब्यात घेतलं. या दोघांवर हल्लेखोरांना मदत केल्याचा आरोप आहे. त्या दोघांचीही कसून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, पंजाबमध्ये सुरक्षा दलानं पंजाबच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

 

पाकिस्तानी सैन्याने काल रात्री जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर येथे नियंत्रण रेषेवर अकारण गोळीबार केला. भारतीय लष्कराने या गोळीबाराला योग्य उत्तर दिले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा