जम्मू-काश्मीरमध्ये शहीद महाराष्ट्रतल्या २ जवानांच्या वारसांना आर्थिक मदत जाहीर

जम्मू काश्मीरमध्ये पूंछ इथं मंगळवारी झालेल्या एका अपघातात शहीद झालेल्या जवानांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. या अपघातात शहीद झालेल्या महाराष्ट्रातल्या दोन जवानांच्या कुटुंबांना राज्य सरकारच्या वतीनं १ कोटी रुपये आर्थिक मदत आणि इतर लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.  मराठा रेजिमेंटचे नायक शुभम समाधान घाडगे हे सातारा जिल्ह्यातल्या कामेरी इथले तर, सिपॉय अक्षय दिगंबर निकुरे हे चंद्रपूर जिल्ह्यातल्या पिंपळगाव इथले रहिवासी आहेत.