डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जम्मू काश्मीरमध्ये येत्या सोमवारपर्यंत जोरदार हिमवृष्टी-हवामान विभाग

जम्मू काश्मीर मध्ये आज पासून येत्या सोमवार पर्यंत जोरदार हिमवृष्टी होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. याशिवाय काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जम्मू मध्ये पुढील काही दिवस सकाळच्या वेळात धुक्याचं साम्राज्य असेल तर दिवसा हवामान ढगाळ राहील.  काश्मीरमध्ये ५ आणि ६ तारखेला थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन हवामान विभागानं यल्लो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान धक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं श्रीनगर विमानतळावरील विमानसेवा विलंबाने सुरु आहे.