जम्मू-काश्मीर विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू

जम्मू-काश्मीर विधानसभेचे महिनाभर चालणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज जम्मूमध्ये नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अभिभाषणाने सुरू होणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील हे पहिलंच अधिवेशन आहे. २०१८ मध्ये पीडीपी आणि भाजपा युतू सरकारच्या कार्यकाळांत अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं होतं. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ओमर अब्दुल्ला येत्या ७ तारखेला अर्थसंकल्प सादर करतील.