जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यांत सुरक्षा दलांच्या दोन संयुक्त मोहिमांमधे सहा दहशतवादी ठार झाले. भारतीय लष्कर , केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पोलिसांनी श्रीनगर इथे घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत आज ही माहिती देण्यात आली. दोन्ही मोहिमा ४८ तासांत यशस्वीपणे पूर्ण झाल्या असून त्यात आपल्या सुरक्षा दलांची जीवितहानी झाली नसल्याचं लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं. सर्व सुरक्षादलांमधला समन्वय आणि स्थानिक नागरिकांचं सहकार्य या मोहिमेत महत्वाचं ठरलं असंही लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
Site Admin | May 16, 2025 3:39 PM | jammu&kashmir
जम्मूकाश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या चकमकीत ६ दहशतवादी ठार
