जम्मू- काश्मीरमध्ये जम्मू- श्रीनगर महामार्ग आज सलग तिसऱ्या दिवशीही वाहतुकीसाठी बंद राहिला. या भागात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झालं असून त्यामुळे सुमारे ६०० वाहनं विविध ठिकाणी अडकून पडली आहेत.
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननं महामार्ग मोकळा करण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेतलं आहे. किश्तवाड- सिंथन- अनंतनाग महामार्ग देखील वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.