जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, तर एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कुलगाम जिल्ह्यातल्या गुड्डर परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली होती, दहशतवाद्यांच्या ठिकाणापर्यंत सुरक्षा दलाचे जवान पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिलं.