जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातल्या अखल देवसर भागात आज सकाळी सुरक्षा दलांसोबत सुरू असलेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. या भागात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर काल संध्याकाळी शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने संयुक्तपणे ही मोहीम राबवली. सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात रात्रभर गोळीबार सुरू होता.
Site Admin | August 2, 2025 8:36 PM | Jammu Kashmir Police
जम्मू काश्मीरमधे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार