जम्मूकाश्मीर : ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली सरकारची मंत्रिमंडळ बैठक

जम्मू काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज जम्मूत नागरी सचिवालय इथं होणार आहे. या बैठकीत अर्थ, आरोग्य आणि शिक्षण विभागाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असून सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात सुधारणा, दंत महाविद्यालयांत त्रिस्तरीय फॅकल्टी स्ट्रक्चर लागू करणं आणि झेलम, बाणगंगा नद्यांच्या संवर्धनासारख्या पर्यावरणविषयक विषयांवर चर्चा होणार आहे.