जम्मू काश्मीर इथल्या डोडा जिल्ह्यात आज लष्कराचं एक वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात १० सैनिकांचा मृत्यू झाला असून दहा जण गंभीर जखमी आहेत. लष्कराचं एक वाहन भाडेवाह ते चंबा मार्गावर असताना हा अपघात झाला. जखमी जवानांना उधमपूर इथल्या लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.
Site Admin | January 22, 2026 8:27 PM
जम्मू-काश्मिरमध्ये झालेल्या अपघातात १० जवानांचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी