November 17, 2025 3:27 PM

printer

जम्मू काश्मीरमधे दहशतवादी कारवायांचं प्रमाण लक्षणीयरीत्या घटलं असल्याचं लष्करप्रमुखांचं प्रतिपादन

जम्मू-काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केला आहे. नवी दिल्लीत चाणक्य संरक्षण संवाद २०२५च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या वर्षी आतापर्यंत ३१ दहशतवादी ठार झाले असून त्यापैकी ६१ टक्के दहशतवादी पाकिस्तानी होते, असंही ते यावेळी म्हणाले.

 

भारत कोणत्याही प्रकारच्या युद्धाला प्रत्युत्तर द्यायला तयार असून जे दहशतवादाचं समर्थन करतील किंवा त्याला पाठिंबा देतील त्यांना योग्य उत्तर दिलं जाईल, असंही द्विवेदी म्हणाले. चाणक्य संरक्षण संवाद २०२५ हा भारतीय लष्कराच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय संवादाची तिसरी आवृत्ती असून यंदाची या संवादाची संकल्पना ‘परफॉर्म टू ट्रान्सफॉर्म: सशक्त, सुरक्षित आणि विकसित भारत’ ही आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.