जम्मू-काश्मीरमध्ये वैष्णोदेवी मंदिर मार्गावर कटरा परिसरात भूस्खलनात मरण पावलेल्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काल कटरा रुग्णालयात जखमींशी संवाद साधल्यानंतर ही घोषणा केली. या दुर्घटनेत जवळपास ३० जणांचा मृत्यू झाला असून, मदत आणि बचावकार्य काल सायंकाळपर्यंत सुरू होतं.