डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 14, 2025 8:17 PM | jammu&kashmir

printer

जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटीसदृश्य पावसामुळे २३ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

जम्मू काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यातल्या चसोटी इथं झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसात २३ जणांचा मृत्यू झाल्याची भीती असून १०० पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात मालमत्तेचंही नुकसान झाल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर इथली मच्छेल माता यात्रा स्थगित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्या इथं तैनात करण्यात आल्या असून मदत आणि बचावकार्य सुमारे २० दिवस चालेल, असा अंदाज संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. ही घटना चसोटी तीर्थक्षेत्र परिसरात झाल्यानं मच्छेल माता यात्रा स्थगित करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत चर्चा करुन शक्य ती सगळी मदत करायचं आश्वासन दिलं. राज्यपाल सिन्हा आणि मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.