डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 12, 2025 2:27 PM | Jammu & Kashmir

printer

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद विरोधी मोहीम सुरूच, २ दहशतवादी ठार

जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम भागातल्या अखल जंगलामध्ये सुरु असलेली दहशतवाद विरोधी मोहीम आज बाराव्या दिवशीही सुरु असून आतापर्यंत २ दहशतवादी ठार झाले आहेत.  सुरक्षा दलांच्या ड्रोन्सपासून बचावण्यासाठी दहशतवादी दाट झाडीत आणि गुहांमध्ये लपले आहेत.  त्यांना शोधण्याच्या प्रयत्नात सुरक्षा दलांचे २ जवान शहीद  झाले असून ९ जवान जखमी झाले आहेत. गेल्या काही वर्षांमधील ही सर्वात मोठी दहशतवाद विरोधी मोहीम असून जम्मू काश्मीरचे पोलीस प्रमुख आणि लष्कराच्या उत्तर कमांडचे कमांडर मोहिमेवर चोवीस तास लक्ष ठेवून आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा