डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 23, 2025 10:03 AM | Jammu & Kashmir

printer

Jammu Kashmir : दहशतवादामुळं उद्धस्त झालेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी ‘वेब पोर्टल’ सुरू

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादामुळं उद्धस्त झालेल्या कुटुंबांना मदत करण्यासाठी एक वेब पोर्टल सुरू करण्यात आलं आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काल या पोर्टलचं उद्घाटन केलं. या उपक्रमामुळे दहशतवादाने त्रस्त झालेल्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुलभ आणि वेगवान होईल. या पोर्टलवर जिल्ह्यानुसार आकडेवारी नोंदवली जाईल, मदत प्रयत्नांचा मागोवा घेतला जाईल. आर्थिक मदत, सानुग्रह अनुदान आणि अनुकंपापूर्ण रोजगार उपलब्ध करणं हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. पीडितांच्या मालमत्तेवरील अतिक्रमणांचीदेखील नोंद केली जाईल. निराकरण न झालेल्या किंवा प्रलंबित दाव्यांसाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये मोफत हेल्पलाइनही सुरू करण्यात आल्या आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा