जम्मू आणि काश्मीरमध्ये, लष्कराच्या रोमियो फोर्स आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप यांनी संयुक्तपणे केलेल्या मोहिमेत, काल पूंछ जिल्ह्यात एक दहशतवाद्यांचा अड्डा उध्वस्त करण्यात आला. या शोध मोहिमेत मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारूगोळा आणि स्फोटके जप्त करण्यात आली.
प्रदेशातील शांतता बिघडवण्याच्या उद्देशाने कट आखून जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद सुरू करण्याच्या उद्देशाने शस्त्रास्त्रांच्या तस्करीच्या व्यापक नेटवर्कचा हा भाग असल्याचं मानलं जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद नष्ट करण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये ही कारवाई म्हणजे आणखी एक यश आहे.