जम्मू – काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि इतर पाच जणांवर, किरू औष्णिक उर्जा प्रकल्पासंदर्भात केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआयने आरोपपत्र दाखल केलं आहे. २०२२ मध्ये, किरू जलविद्युत प्रकल्पातल्या २२०० कोटी रुपयांच्या बांधकामाच्या कंत्राटात भ्रष्टाचारा झाल्याच्या आरोपांची चौकशी सीबीआय मार्फत करण्याची विनंती जम्मू – काश्मीर सरकारने केली होती.
या प्रकरणी चिनाब व्हॅली पॉवर प्रोजेक्ट्सचे तत्कालीन अध्यक्ष नवीन कुमार चौधरी आणि इतर अधिकारी एमएस बाबू, एमके मित्तल आणि अरुण कुमार मिश्रा यांच्यासह पटेल इंजिनिअरिंग लिमिटेड यां कंपनीचा समावेश आहे. चिनाब नदीवरचा किरू जलविद्युत प्रकल्प किश्तवाड जिल्ह्यात उभारण्यात येत आहे.
किरू जलविद्युत प्रकल्प ही जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदीवर विकसित केली जात असलेली योजना आहे.