जम्मूकाश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

जम्मू आणि काश्मीरमध्ये, किश्तवाड जिल्ह्यात सिंगपोरा चतरू इथल्या जंगलात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून लष्करानं स्थानिक पोलिसांच्या सहकार्यानं शारी आणि मंद्राल ढोक परिसरातल्या जंगलात ही मोहीम राबवली.  २ ते ३ दहशतवादी सुरक्षा दलाच्या जाळ्यात अडकल्याचा अंदाज असून, ही मोहीम अजूनही सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.