डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

April 12, 2025 2:36 PM | Jammu and Kashmir

printer

दहशतवाद्यांच्या नियंत्रण रेषेवरुन घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडला

जम्मू काश्मीरच्या अखनूर विभागात दहशतवाद्यांच्या समूहाचा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन घुसखोरीचा प्रयत्न आज भारतीय लष्करानं हाणून पाडला. अखनूरमधे केरी भट्टल परिसरात काल रात्री काही सशस्त्र दहशतवाद्यांची हालचाल लष्करानं टिपली, आणि त्यांना शरण यायला सांगितलं.

 

त्यानंतर झालेल्या चकमकीत लष्कराचा कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी शहीद झाला. या प्रकारानंतर संबंधित क्षेत्रात बंदोबस्त वाढवण्यात आला असून शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.