जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांविरुद्ध गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेल्या लष्करी कारवाईदरम्यान आज सकाळी एका दहशतवाद्याला भारतीय जवानांनी कंठस्नान घातलं. काल रात्री झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले असून अनेक सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.
या परिसरात ८ दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यावरुन शोध मोहीम राबवण्यात येत आहे.