जमैकामध्ये ‘मेलिसा’ चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४५ वर पोहोचली आहे, तर १५ जण अद्याप बेपत्ता आहेत. गेल्या महिन्याच्या २८ तारखेला पश्चिम जमैका मध्ये हे वादळ धडकलं होतं. त्यानंतर अजूनही दोन शहरांचा संपर्क तुटला आहे. या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु आहे.
या वादळात ३० हजारापेक्षा जास्त कुटुंब विस्थापित झाली असून १ हजारापेक्षा जास्त नागरिक ८८ निवारा छावण्यांच्या आश्रयाला असल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिली.