राज्यात जलयुक्त शिवार अभियानात सामाजिक संस्थांचा सहभाग असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ए.टी.ई.चंद्रा फौंडेशन आणि मृद आणि जलसंधारण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार फौंडेशनने विकसित केलेल्या अवनी ग्रामीण ॲपच्या माध्यमातून योजनेतील कामांच्या डेटाचे संकलन आणि नियंत्रण करण्यात येणार आहे. तसेच फौंडेशनमार्फत स्वयंसेवी संस्थांमध्ये नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अवनी ग्रामीण ॲप संदर्भातील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजने अंतर्गात गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार तसंच अमृत सरोवर हे उपक्रम राबवले जातात.
Site Admin | March 16, 2025 7:15 PM | Jalyukt Shivar Abhiyan
जलयुक्त शिवार अभियानात सामाजिक संस्थांचा सहभाग
