जळगावात जळगाव प्रकल्प संचालक, जिल्हा अधिक्षक, कृषी विज्ञान केंद्र यांनी संयुक्तपणे रानभाजी महोत्सवाचं आयोजन नुकतंच केलं. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या महोत्सवाला भेट दिली. शेतकरी गट तसंच महिला बचत गटांनी पारंपरिक पद्धतीने पिकवलेल्या भाज्यांचं आणि प्रक्रिया उद्योगाचे स्टॉल महोत्सवात लावले होते. यावल तालुक्यातल्या आदिवासींनी यावेळी आदिवासी नृत्य तसंच वादन सादर केलं.
Site Admin | August 10, 2025 6:29 PM
जळगावात रानभाजी महोत्सवाचं आयोजन
