June 12, 2025 3:08 PM | Jalgaon | Rain

printer

जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस

जळगाव शहरासह जिल्ह्यात काल रात्री  प्रचंड वादळी वाऱ्यांसह तुफान पावसाने हजेरी लावली. या पावसाचा जोर इतका प्रचंड होता,की रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहनांसह नागरिकांना चालणे देखील अवघड झालं होतं असं आमच्या वार्ताहराने कळवलं आहे. 

 

परिसरात वीज पुरवठा खंडित झाला होता. सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि भर पावसात घराबाहेर न पडता सुरक्षित ठिकाणी थांबावं तसेच आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाइन क्रमांक 1077 वर त्वरित संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा प्रशासनानं  केलं आहे.