जळगाव जिल्ह्यात कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकानं केलेल्या कारवाईत चोपडा तालुक्यातल्या चुंचाळे इथून १७ लाख ८२ हजार २०० रुपये किंमतीचे बनावट एचटीबीटी कापूस बियाणं जप्त केलं. या प्रकरणी नितीन नंदलाल चौधरी या संशयित आरोपीविरोधात बियाणांशी संबंधित विविध नियम आणि कायदे, महाराष्ट्र कापूस बियाणं अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अक्कुलखेडा रस्त्यावर एका पत्र्याच्या शेडवर टाकलेल्या छाप्यात कापसाच्या प्रतिबंधित बायाणांची १ हजार २७३ पाकिटे प्रतिबंधित कापूस बियाणे जप्त केल्याचं कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे.